मुख्य पान
निविदा
जाहिराती
बातम्या
बदली / भरती प्रक्रिया
  रायगड जिल्हा परिषद
  जि. प. अधिनियम
  रचना व प्रशासन
  मान्यवर
  सदस्य व पदाधिकारी
  सूची
  विभाग व योजना
  माहितीचा अधिकार
  ई-गव्हर्नंस
  अंदाज पत्रक
  नाविन्यपूर्ण उपक्रम

 

 

विभाग व योजना

पशुसंवर्धन विभाग

दृष्टीक्षेपात पशुसंवर्धन विभाग

पशुसंवर्धनातुन ग्राम समृध्दीकडे

 • सन २०१०-११ मध्ये आर्थिक , भौतिक, सर्व कामे १००% साध्य
  • जि.प. सेस योजना - १००%
  • डि.पी.डी.सी. योजना - १००%
  • नॉन प्लॅन योजना - १००%

आपली उद्दीष्टे

 • पशुधन स्वास्थ्य तथा मानव स्वास्थ्य
 • पशुधनाची वाढ
 • पशुधनातन पुरक अन्न पुरवठा
 • रोजगार निर्मीती
 • पशुधनातुन मन:स्वाथ्य तथा मनोरंजन
अ.क्र.
योजनेचे नाव
तरतुद
(रु. लाखात)
खर्च
(रु. लाखात)
टक्केवारी
जि.प. सेस
९९
९९
१००%
जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण योजना
१३०
१३०
१००%
विशेष घटक योजना
२.५
२.५
१००%
राष्ट्रीय कृषी विकास योजना
२८.५
२८.५
१००%

विशेष पशुधन विकास कार्यक्रम

लाभाचे स्वरूप
संकरित कालवडी व सुधारीत जातीच्या म्हैशींच्या पारडयांची जोपासना करण्यासाठी पशुखाद्य विमा लस जंतनाशके इत्यादींसाठी खर्चाचे अनुदान खालील प्रमाणे राहील.

अ) अल्प व अत्यल्प भूधारक ५० टक्के कमाल मर्यादा रू. ६०००/-
ब) शेतमजूर ६६.६६ टक्के कमाल मर्यादा रू. ८०००/-
क) कमाल मर्यादेपेक्षा पशुखादयासाठी अधिक लागणारा खर्च लाभार्थीने करावा.
ड) लाभार्थीकडिल संकरीत कालवडीला तिच्या वयाच्या चौथ्या महिन्यापासून बत्तीस महिन्यापर्यंत / पारडीला तिच्या वयाच्या चौथ्या महिन्यापासून चाळीस महिन्यांपर्यंत पशुखाद्याच्या स्वरूपात अनुदान देण्यात येईल.

लाभार्थी निवडीचे निकष
अ) लाभार्थी अल्पभूधारक अत्यल्प भूधारक किंवा भूमीहीन शेतमजुर असावा.
ब) लाभार्थीकडे कृत्रिम रेतनापासून जन्मलेली किंवा बाजारातून खरेदी केलेली संकरित कालवड किंवा सुधारीत म्हैस पारडी असावी.
क) लाभार्थी दारिद्र रेषेखालील असावा.

आवश्यक कागदपत्रे
अ) नमुन्यातील परिपूर्ण अर्ज
ब) दारिद्र रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
क) पशुवैदयकीय दवाखान्यांचे पारडीच्या् / कालवडीच्या जन्मतारखेचे प्रमाणपत्र.
ड) कालवड / पारडी विकत घेतली असेल तर ग्रामपंचायतीचा दाखला.

योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क
पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती

सदर योजनेअतर्गत मागील तीन वर्षात झालेला खर्च (रूपये लाखात)

अ.क्र.
सन
तरतूद
खर्च
२००८-०९
०.७०
०.७०
२००९-१०
२.००
२.००
२०१०-११
२.००
२.००


शेतक-यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन

लाभाचे स्वरूप
अ) संकरित कालवडी व सुधारीत जातीच्या म्हैशींच्या पारडयांची जोपासना करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर मका बियाणे वाटप करणे.
ब) प्रति लाभार्थी मका बियाणे रूपये २५०/- च्या मर्यादेपर्यंत वस्तूरूपाने पुरविणे.

लाभार्थी निवडीचे निकष
अ) लाभार्थीकडे स्वतःची जनावरे असावीत.
ब) लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन असावी.
क) एका वर्षात एका लाभार्थीला एकाच वेळी अनुदानाचा लाभ देण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे
अ) जमीन असल्याबाबत ७/१२ उतारा
ब) लाभार्थिचे बियाणे मागणीपत्र

योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क
पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती


सदर योजनेअतर्गत मागील तीन वर्षात झालेला खर्च (रूपये लाखात)

अ.क्र.
सन
तरतूद
खर्च
२००८-०९
१.००
१.००
२००९-१०
१.००
१.००
२०१०-११
१.००
१.००

अनुसूचित जाती / नवबौध्द लाभाथींना दुधाळ जनावरांचे गटवाटप

लाभाचे स्वरूप
अ) प्रती लाभार्थी ३ म्हैशी किंवा ३ गायींचा एक गट ५० टक्के अनुदानावर वाटप होईल. सदर योजनेअंतर्गत जनावरांची किंमत नाबार्डने ठरवून दिलेल्या किमतीनुसार म्हणजेच प्रती संकरीत गाय रु. १४०००/- व प्रती म्हैस रु. १६०००/- राहील.
ब) गाईसाठी १०० टक्के विमा अनुदान रक्कम रु. ३१५/- व म्हैशीसाठी १०० टक्के विमा अनुदान रक्कम रु. ३६०/- राहील.
क) एका वर्षामध्ये संकरीत गाईस्र म्हैशीस लाळखुरकूत लसीच्या मात्रा दोन वेळा व जंतनाशक औषधे तीन वेळा १०० टक्के अनुदानावर पुरविण्यात येतील.
ड) दुभत्या जनावरांसाठी आवश्यक मिनरल मिक्शर १०० टक्के अनुदानावर पुरविण्यात येईल.
ई) अनुदानाची कमाल मर्यादा गाईसाठी रु. ७५३०/- व म्हैशीसाठी रु. ८५७०/- एवढी राहील.

लाभार्थी निवडीचे निकष
अ) लाभार्थी अनुसूचित जातीतील / नवबौध्द असावा.
ब) लाभार्थीकडे स्वतःची जागा असावी.
क) एकाच कुटुंबातील दोन लाभार्थीना सदर योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
ड) या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थीना हा व्यवसाय किमान तीन वर्ष करणे आवश्यक आहे.
ई) या योजनेतून लाभ घेतलेले जनावर विकता येणार नाही.
फ) १ मे २००१ नंतर तिसरी संतती झाली असेल किंवा होईल असे लाभार्थी या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत.
इ) योजनेमध्ये ३३टक्के महीला लाभार्थी असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे
अ) विहीत नमुन्यातील मागणी अर्ज.
ब) जमिन असल्याबाबतचा ७/१२ उतारा.
क) जातीचा दाखल.
ड) रहिवाशी दाखला

योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क
पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती

सदर योजनेअतर्गत मागील तीन वर्षात झालेला खर्च (रूपये लाखात)

अ.क्र.
सन
तरतूद
खर्च
२००८-०९
१८.००
१७.८०
२००९-१०
१३.००
१३.००
२०१०-११
२.००
२.००

गायी म्हशींमध्ये दुधाचे उत्पादन वाढविणे

पशुसंवर्धन खात्याच्या योजना हया अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक सर्वसाधारण शेतकयांना वैयक्तीक लाभाच्या एकही योजना कार्यरत नसल्याने अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक यांना दुधाळ जनावरांचे गायी / म्हशींचे गट वाटप करणे हया योजने अंतर्गत प्रथमतः २ संकरित गायी अथवा संकरित म्हशींचे गट वाटप करण्यात यावे व ६ महिन्याच्या कालावधीनंतर त्याच लाभार्थीस पुन्हा एक संकरित गाय अथवा म्हैस वाटप करण्यात यावे. दुधाळ जनावरांच्या गटासमवेत पशुखाद्य वाटपाचाही अंतर्भाव व्हावा. सदरची योजना ही होतकरू पात्र दुग्धव्यवसायीकांची आवड असणाया तसेच जिल्हा परिषद यजनेकडिल जवाहर विहीर अथवा सिंचन विहीर योजना असलेल्या शेतकयांचा प्राधान्याने विचार व्हावा. या योजनेमध्ये ७५ टक्के शासकीय अनुदान व २५ टक्के लाभार्थी हिस्सा अथवा बँकेचे अल्प व्याज दराने कर्जरूपाने भरणा करणारे पात्र लाभार्थीची निवड करावी. वरील योजना ही विदर्भ पॅकेज अथवा मराठवाडा विकास पॅकेज या धर्तीवर जनावरांच्या ठरलेल्या किंमतीच्या आधारे राबविण्यात यावी. याकरिता जिल्हयातील अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांची संख्या महसूल विभागाकडून निश्चीत करून समूह गट पध्दतीने व सहकारी संस्था असलेल्या संस्थांना अथवा दुग्धव्यवसायातील अर्थक दृष्टया सक्षम यशस्वी महिला बचत गटाची संख्या निश्चीत करून निधीची मागणी शासनाकडे करावी लागेल.

अनुसूचित जाती / नवबौध्द लाभाथीना शेळयांचे गटवाटप

लाभाचे स्वरुप
अ) अनुसूचित जाती / नवबौध्द लाभार्थीना प्रतिलाभार्थी १० शेळया १ बोकड याप्रमाणे ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल. अनुदानाची रक्कम प्रतिलाभार्थी रु. १४०१३/- एवढी राहील.
ब) सर्व शेळया व बोकडांचा ३ वर्षाचा विमा काढणे बंधनकारक राहील.

लाभार्थी निवडीचा निकष
अ) लाभार्थी अनुसूचित जाती / नवबौध्द असावा
ब) लाभार्थीस शेळी पालनाची आवड असावी.
क) लाभार्थीकडे शेळीपालनाकरिता जागा उपलब्ध असावी.
ड) या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थीना हा व्यवसाय किमान तीन वर्ष करणे आवश्यक आहे.
ई) या योजनेतून लाभ घेतलेले जनावर विकता येणार नाही.
फ) १ मे २००१ नंतर तिसरी संतती झाली असेल किंवा होईल असे लाभार्थी या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत.
ग) योजनेमध्ये ३३ टक्के महीला लाभार्थी असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे
अ) विहीत नमुन्यातील मागणी अर्ज.
ब) जमिन असल्याबाबतचा ७/१२ उतारा.
क) जातीचा दाखल.
ड) रहिवाशी दाखला

योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क
पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती (संबंधित)

सदर योजनेअतर्गत मागील तीन वर्षात झालेला खर्च (रूपये लाखात)

अ.क्र.
सन
तरतूद
खर्च
२००८-०९
२.००
१.९६
२००९-१०
२.००
२.००
२०१०-११
२.००
२.००

 

शेतकयाना संकरीत दुधाळ गाई पुरविणे  

लाभाचे स्वरुप
अ) प्रतिलाभार्थी एक दुधाळ गाईसाठी ५० टक्के अनुदान रु. १००००/- देण्यात येईल.
ब) उर्वरीत ५० टक्के रक्कम रु. १००००/- लाभार्थीने स्वतचे किंवा बॅक कर्जादवारे भरावयाचे आहेत.
क) खरेदी केलेल्या गाईचा एक वर्षाचा विमा लाभार्थीने स्वखर्चाने काढावयाचा आहे.

लाभार्थी निवडीचा निकष
अ) योजनेतील लाभार्थी दुगधव्यवसायीक असावा व त्याला दुग्धव्यवसायाचा पुर्वानुभव असावा.
ब) पुरविलेल्या संकरीत गाईमध्ये पुढील संकर करणेसाठी जवळच्या पशवैदयकीय दवाखान्यातून कृत्रिम रेतन करून घेणे बंधनकारक आहे.
क) संकरित दुधाळ गायींची खरेदी लाभार्थीच्या पसंतीने व त्याच्या मागणीनुसार तसेच स्थानिक भौगोलीक परिस्थीती विचारात घेवून स्थानिक अथवा जिल्हयातील / जिल्हयाबाहेर करण्यात येईल.
ड) या योजनेतून लाभ घेतलेले जनावर विकता येणार नाही.
ई) १ मे २००१ नंतर तिसरी संतती झाली असेल किंवा होईल असे लाभार्थी या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत.
फ) योजनेमध्ये ३३ टक्के महीला लाभार्थी असणे आवश्यक आहे.

 

आवश्यक कागदपत्रे
अ) लाभार्थीचा परिपूर्ण अर्ज
ब) जमिनीच्या उतायाची सत्य प्रत किंवा भूमिहीन असल्याचा दाखला.
क) रहीवासी दाखला.

योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क
पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती (संबंधित)

सदर योजनेअतर्गत मागील तीन वर्षात झालेला खर्च (रूपये लाखात)

अ.क्र.
सन
तरतूद
खर्च
२००८-०९
४.९७
४.९७
२००९-१०
१४.५०
१४.५०
२०१०-११
१४.५०
१४.५०

सुधारीत जातीच्या म्हैशींचा पुरवठा  

लाभाचे स्वरुप
अ) प्रति लाभार्थी एक सुधारीत म्हैशीसाठी ५० टक्के अनुदान रु. १३०००/- देण्यात येईल.
ब) बाजारापासून लाभार्थीपर्यंत म्हैस वाहतूक खर्चासाठी ५० टक्के अनुदान रू. १०००/- राहील.
क) ५० टक्के खाद्य अनुदान रू. १०००/- राहील.
ड) उर्वरीत ५० टक्के हिस्सा रू. १५०००/- लाभार्थीने स्वतःकडचे भरावयाचे आहेत.
ई) खरेदी केलेल्या म्हशीचा एक वर्षाचा विमा लाभार्थीने स्वखर्चाने काढावयाचा आहे.

लाभार्थी निवडीचा निकष
अ) योजनेतील लाभार्थी दुगधव्यवसायीक असावा व त्याला दुग्धव्यवसायाचा पुर्वानुभव असावा.
ब) पुरविलेल्या सुधारीत जातीच्या म्हैशीमध्य पुढील संकर करणेसाठी जवळच्या पशवैदयकीय दवाखान्यातून कृत्रिम रेतन करून घेणे बंधनकारक आहे.
क) सुधारीत जातीच्या म्हैशीची खरेदी लाभार्थीच्या पसंतीने व त्याच्या मागणीनुसार तसेच स्थानिक भौगोलीक परिस्थीती विचारात घेवून स्थानिक अथवा जिल्हयातील / जिल्हयाबाहेर करण्यात येईल.
ड) या योजनेतून लाभ घेतलेले जनावर विकता येणार नाही.
ई) १ मे २००१ नंतर तिसरी संतती झाली असेल किंवा होईल असे लाभार्थी या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत.
फ) योजनेमध्ये ३३ टक्के महीला लाभार्थी असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे
अ) लाभार्थीचा परिपूर्ण अर्ज
ब) जमिनीच्या उतायाची सत्य प्रत किंवा भूमिहीन असल्याचा दाखला.
क) रहीवासी दाखला.

योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क
पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती (संबंधित)

सदर योजनेअतर्गत मागील तीन वर्षात झालेला खर्च (रूपये लाखात)

अ.क्र.
सन
तरतूद
खर्च
२००८-०९
८.००
८.००
२००९-१०
२७.००
२७.००
२०१०-११
२८.००
२८.००

म्हशींच्या पारडयांची जोपासना व संगोपन  

रायगड जिल्हयामध्ये दुग्धव्यवसाय मुंबई बाजारपेठ जवळ असल्याने मोठया प्रमाणात केले जाते. त्या अनुषंगाने तबेलेधारकाकडे म्हशींच्या पारडयाकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पारडयांच्या संख्येमध्ये लक्षणिय घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यावर उपाययोजना म्हणून दुग्धव्यवसायाची मानसिकता प्रबळ करण्याकरिता प्रभावीपणे प्रसिध्दी व प्रचारातून प्रबोधन करणे पारडयांना ७५टक्के अनुदानाने खाद्य जंतनाशक औषध पाजणे सक्तीचे करणे पारडी जिवंत ठेवण्याकरिता उद्यूक्त करणे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ऋतूचक्राप्रमाणे फया व घटसर्पाचे लसीकाण करणे वासरांचे संगोपन व देखभालबाबत चलचित्रपट दाखविणे पोस्टर तयार करून तबेल्यांचे दर्शनी भागात तांत्रिकदृष्टया माहिती असलेली भिंतीपत्रके लावावे.

वैरण विकास योजनांची व्याप्ती वाढवून मोठया प्रमाणावर वैरण बियाणे खते व वैरण विकासाकरिता आवश्यक मुलभूत सुविधा दुग्धव्यवसायीकांना उपलब्ध करून दिल्यास दुग्धव्यवसाय उन्नत होण्यास मदत होईल याकरिता दुधवाढीकरिता क्षारमिश्रण ३ चा पुरवठा करणे प्रजनन क्षमता स्थिर ठेवण्यासाठी नामांकित कंपन्यांचे औषध पुरवठा करणे याकरिता पशुवैदयक शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेणे भाकडकाळ नियंत्रणात ठेवणे / कमी करणेकरिता संशोधनाव्दारे निदान करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करणे म्हशींमधील मुक्का माज ओळखणेकरिता आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे इत्यादी बाबी अवलंबविल्यास जनावर वेळेवर माजावर येवून प्रजनन प्रक्रियेवर दुष्परिणाम कमी होवून जास्त दूध वाढविणेकरिता अप्रत्यक्षरित्या हातभार लागेल.

कोकणकन्या व उस्मानाबादी शेळी गटांचे वाटप करणे

महिला बचत गट व सुशिक्षित युवती यांना ५ शेळी व १ बोकडगट वाटप योजनेव्दारे जिल्हयातील र्डोगराळ भागातील अदिवासी / सुशिक्षीत बेरोजगार / महिला बचत गट यांचा प्राधान्याने लाभार्थी म्हणून विचार करण्यात यावा. सदर योजना ७५ टक्के अनुदान व २५ टक्के लाभार्थी हिस्सा अथवा बँकेचे अल्प व्याज दराने कर्ज याप्रमाणे राबविण्यात यावी.

अंडी उबवणी केंद्राची स्थापना करणे

जिल्हयामध्ये सधन कुक्कुट प्रकल्प पेण येथे अंडी उबवणी केंद्र ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनाअंतर्गत मंजूर झाली असल्याने अंडी उबवणी केंद्र पूर्ण कार्यान्वीत होईपर्यंत अंडी उबवणी केंद्राकरिता आवश्यक अंडी ही खाजगी अथवा सहकारी कुक्कुट पालन संस्थेकडून ३०० या जातीच्या र्कोबडयांची अंडी खरेदी करून एक दिवासाचे पिल्ले तयार करून प्राधान्याने कुक्कुट व्यवसायाची आवड असणाया व सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती अर्थक दृष्टया स्वयंसहाय्यता महिला बचतगट व्यवसायाकरिता पुरेसी जागा बाजारपेठ खाद्याची उपलब्धता तसेच समूह गटाकडून भविष्यात तयार होणारी अंडी ही ग्रामस्तरावरील शाळेतील कूपोषीत बालकांना शालेय पोषण आहारामध्ये आठवडयातून दोन वेळा अंडी पुरविण्यापेक्षा दररोज अंडी देण्यात यावी.

जेणेकरून स्थानिक दृष्टया बाजारपेठही उपलब्ध होवू शकेल. ज्या सुशीक्षीत युवक / युवतींची पशुसंवर्धन विभागाकडिल उजळणी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल अशा बेरोजगारांना प्राधान्याने देण्यात यावे. सदर योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी ५०० एक दिवसाची पिल्ले हि प्राथमिक लसीकरण करून वाटप करण्यात यावी. या योजनेमध्ये पक्ष्यांना आठ आठवडयापर्यंत आवश्यक खाद्य औषधे पिल्ले ही ७५ टक्के अनुदानाने व २५टक्के लाभार्थी हिस्सा अथवा बँकेचे अल्प व्याज दराने कर्जरूपाने भरणा करणारे पात्र लाभार्थीची निवड करावी.

यामध्ये पक्ष्यांचा निवारा करणेसाठी पिंजरा अथवा शेडची व्यवस्था स्वतः करावी लागेल. महिला बचत गटांना १००० पिल्ले देवून त्या त्या ८ आठवडयात वाढवून ग्राम पातळीवर विकि्र करणे करिता प्रोत्साहन देवून त्यांनाही ७५ टक्के अनुदान व २५टक्के स्वहिस्सा अथवा बँकेचे अल्प व्याज दराने कर्जरूपाने भरणा करणारे पात्र लाभार्थीची निवड करावी.

देशी गायीमध्ये अनुवंशीक सुधारणा करणे

रायगड जिल्हा नाशीक जिल्हयाच्या जवळ असल्याने कर्जत पाली महाड या तालूक्यांमध्ये डांगी पशुपैदास केंद्र स्थापन करून लगतचे तालूक्यांमध्ये भौगोलीक परिस्थिती व हवामान र्डोगराळ भाग मूबलक गवत इ. बाबींचा विचार केला असता डांगी पशुपैदास केंद्रामुळे देशी गायींमध्ये अनुवंशीक सुधारणा होवून उत्तम प्रकारचे बैल शेती कामास उपलब्ध हातील.

याकरिता गावठी गायींमध्ये पैदास करण्याकरिता पैदास केंद्रावरील वळूंच्या रेत मात्रा तयार करून गोठीत विर मात्रा तयार करून कृत्रिम रेतनाव्दारे पशुपैदास योजना राबवावी लागेल. ज्या गावांमध्ये कृत्रिम रेतन सुविधा उपलब्ध नसेल अथवा पशुपैदास केंद्राच्या जास्त अंतरावर असलेल्या गावातून तसेच र्डोगराळ अतिदुर्गम गावांमध्ये शुध्द डांगी वळूचा पुरवठा करावा लागेल.

योजना क्र. ४ (अ) शुध्द जातीचे वळू / रेडे नैसर्गीक संयोगाव्दारे प्रजननासाठी वाटप करणे व त्या अनुषगाने अनुवंशीक सुधारणा घडवून आणून जास्त दुध देणाया गायी व म्हशींची पैदास करणे.

रायगड जिल्हयामध्ये पनवेल कर्जत अलिबाग माणगाव महाड श्रीवर्धन पाली या तालूक्यांमध्ये माठया प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जातो. दुग्धव्यवसायीकांमध्ये कृत्रिम रेतन न करता वळू व्दारे नैसर्गक संयोगातून प्रजनन करण्याचा कल असल्यामुळे त्यांना ७५ टक्के अनुदानाने व २५ टक्के स्वहिस्सा अथवा बँकेचे अल्प व्याज दराने कर्जरूपाने भरणा करणारे पात्र लाभार्थीची निवड करावी. गुजरात मधील म्हैसांना मुहा या जातीचे वळूचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा.

पशुवैद्यकिय दवाखाने दुरुस्ती व देखभाल

जि. प. सेस योजना सन १०-११
उपलब्ध तरतुद - रु. २७,००,०००/-

पशुवैदयकीय दवाखाना गुळसुदे ता. पनवेल - दुरुस्ती रु. ३,९८,८७० /-
पशुवैदयकीय दवाखाना विधणे ता. उरण - दुरुस्ती रु. ४८,२७३ /-
पशुवैदयकीय दवाखाना पाशाणे ता. कर्जत - दुरुस्ती रु. ३,६०,९७० /-
पशुवैदयकीय दवाखाना माथेरान ता. कर्जत रु. ५,६१,८८०/-
पशुवैदयकीय दवाखाना उरण ता. उरण रु. ५०,००० /-
पशुवैदयकीय दवाखाना रामराज ता. अलिबाग रु. ६,०३,१५६ /-
पशुवैदयकीय दवाखाना चई ता. कर्जत रु. १,५७,८७३ /-
पशुवैदयकीय दवाखाना कशेळे ता. कर्जत रु. ३,०७,१०७ /-
पशुवैदयकीय दवाखाना नागोठणे ता. रोहा रु. २,०९,०१३ /-
एकूण रु. २६,९७,१४२/-

सन २०१०-११ मध्ये आठ नविन बांधकामांची भर

 • पशुवैद्यकिय दवाखाना चिचवली ता. कर्जत चे दर्जेदार बांधकाम पुर्ण
 • पशुवैद्यकिय दवाखाना कशेळे ता. कर्जत चे दर्जेदार बांधकाम पुर्ण
 • पशुवैद्यकिय दवाखाना गौरकामथ ता. कर्जत चे काम प्रगतीपथावर
 • पशुवैद्यकिय दवाखाना भालगाव ता. रोहा चे काम पुर्ण
 • पशुवैद्यकिय दवाखाना बागमांडला ता. श्रीवर्धन चे काम प्रगतीपथावर
 • पशुवैद्यकिय दवाखाना रामराज ता. अलिबाग चे काम प्रगतीपथावर
 • पशुवैद्यकिय दवाखाना नागोठणे ता. रोहा चे काम प्रगतीपथावर
 • पशुवैद्यकिय दवाखाना नेरे ता. पनवेल चे काम पूर्ण

नाविन्यपुर्ण कामे

 • सन २०१० पासन चिकन व मटण चे विक्रेत्यांचे नोंदणी करण्यामुळे रायगड जिल्हातील जनतेला मिळणार स्वच्छ चिकन व मटण.
 • पशुधन विकास अधिका-यां मार्फत नियमित चिकन मटण सेंटरला भेटी व त्यामुळे शिळे मटण- चिकन किवा आजारी बोकड किवा कबडयांच्या विक्रेंत्यांचे लायसन्स जप्त होणार.
 • माहे मार्च २०११ अखेर जि. प. सेस फंडात जमा परवाना शुल्क रक्कम रु. ६,८८,५००/-

नाविन्यपुर्ण योजना

 • ५०% अनुदानावर संकरित गाईंच्या कालवडी व सुधारीत म्हैस पारडयांना खाद्य (रॅशन) वाटप
 • ७५% अनुदानावर दुग्ध व्यवसायीकांना किटली वाटप
 • ७५% अनुदानावर सुधारीत जातीचे बोकड वाटप
 • १००% अनुदानावर मका व चवळी वैरण बियाणे वाटप
१८ वी पशुगणना २००७ नुसार पशुधन संख्या

अ.क्र.
जनावरांचा प्रकार
पशुधन संख्या
विदेशी गायी वर्ग
२२४
संकरीत गाय वर्ग
८०३७
देशी गायी वर्ग
३२३९७८
म्हैस वर्ग
८००५१
पैदासक्षम गाय वर्ग
९०९५३
पैदासक्षम म्हैस वर्ग
५७५२०
शेळया
९०३८७
मेंढया
१४८४
घोडे
९६५
१०
डूकरे
१४८५
११
कुत्रे
५५१८०
१२
ससे
२८६१
१३
कोंबडया
४२०००००
जिल्हयाचे सध्याचे दरडोई दुधाचे उत्पादन - १२३ ग्रॅम प्रति दिवस
ICMR Norms प्रमाणे आवश्यक दुध - २५० ग्रॅम प्रति दिवस
एकूण तूट - १२७ ग्रॅम प्रति दिवस
 
जिल्हयाचे सध्याचे दरडोई अंडयाचे उत्पादन - वर्षाला - ४८ अंडी
ICMR Norms प्रमाणे आवश्यक अंडी - १८० अंडी
एकूण तूट - १३२ अंडी दरडोई

वैयक्तीक लाभाच्या योजना २००९-१० व २०१०-११ अखेर

अ.क्र.
गटाचे नाव
साध्य सन २००९-१०
साध्य सन २०१०-११
 
 
५०% अनुदानावर संकरीत गाय वाटप
५०% अनुदानावर संकरीत म्हैस वाटप
५०% अनुदानावर संकरीत गाय वाटप
५०% अनुदानावर संकरीत म्हैस वाटप
1
अलिबाग
17
15
15
19
2
पेण
19
20
10
12
3
पनवेल
8
20
10
12
4
उरण
5
7
9
10
5
कर्जत
6
8
8
10
6
खालापूर
18
20
8
10
7
मुरूड
4
6
5
5
8
पाली
9
15
12
12
9
रोहा
11
11
8
10
10
माणगाव
16
21
23
39
11
श्रीवर्धन
8
3
5
12
12
म्हसळा
6
7
4
7
13
महाड
10
11
12
12
14
पोलादपूर
8
12
12
12
15
तळा
0
4
4
5
 
एकूण
145
180
145
187

लसिकरण

जिल्हा मध्ये १) लाळया खुरकत, २) एच एस, ३) बी. क्यु लसींचे जनावराना १००% लसीकरण पुर्ण.

त्यामुळे साथीचे प्रमाण शुन्य टक्के पर्यंत नेणे शक्य झाले. कोकणात भेडसावणारा बोटयुलिझम हा महा भयंकर रोग आटोक्यात आणणे शक्य झाले.

औषधे, लसी, फणींचर व उपकरणे खरेदी मध्ये दर्जेदार उपयुक्त साहीत्यांनी दवाखाने सुसज्ज करणे

१) फणीचर सेट, २) इनस्ट्रुमेंट ट्राली, ३) ऑपरेशन व पोस्टमाटम सेट, ४) अनटी रेबीज व्हॅक्सीन

नविन दवाखान्यांची स्थापना

सन २०१०- ११ मध्ये कामार्ली ता. पेण व मोहपाडा ता. खालापुर येथे २ नवीन दवाखान्यांची स्थापना झाली. सध्या जिल्हा परिषदे अंतर्गत श्रेणी १ चे ३८ पशुवैद्यकीय दवाखाने व श्रेणी २ चे ६२ पशुवैद्यकीय दवाखाने असे एकूण १०० दवाखाने कार्यरत आहेत या प्रत्येक ठिकाणी कृत्रिम रेतन ही सुविधा उपलब्ध आहे.

५०% अनुदानावर संकरीत गायी व सुधारीत म्हशी यांचे विक्रमी वाटप

१) सन २०१०-११ मध्ये जि. प. सेस योजनेतुन १४५ लाभार्थींना संकरीत गाई व १८० लाभार्थींना सुधारीत जातीच्या म्हैशींचे वाटप करण्यात आले.
२) सन २०११-१२ मध्ये जि. प. सेस योजनेतुन १७५ लाभार्थिना संकरीत गाई व ३०० लाभार्थींना सुधारीत म्हैशींचे वाटप करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच विषेश घटक योजनेतुन १२० म्हैशी व १५५ शेळयांचे वाटप करण्यात येणार आहे

कुक्कुट प्रकल्प पेण

१) जिल्हा नियोजन मंडळा कडुन नियमित योजने मधुन सन २०१०-११ मध्ये प्राप्त २० लक्ष रुपया मधुन प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी जनरेटर अटोमेटीक वॉटरर व फिडर, ब्रुडर, लेयींग नेस्ट व एग कन्दंलर इत्यादी खरेदी करण्यात आली.
२) सधन कुकुट प्रकल्प येथील सर्व रिक्त पदे भण्यात आली.
३) राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत जुन्या पोल्ट्री शेड्सची दुरुस्ती व अंतर्गत रस्ते व गोडावुन बांधकाम सन २०११-१२ मध्ये प्रस्तावीत.
४) बचत गटांना छोटया उबवणुक यंत्रांचा व उबवणीय अंडयांचा पुरवठा करुन एक दिवसीय पीलांच्या निर्मीतीत वाढ करणे प्रस्तावीत.
५) सन २०१०-११ मध्ये शेतकर्‍यांना आर आय आर व अनस्ट्रोलार्प जातीच्या कोंबडया व उबवण्याची उंडी पुरवीण्यात आली.

नागोठणे येथे जिल्हयातील सर्वात अत्याधुनिक दवाखाना

1) सन २०१०-११ मध्ये बांधकाम पुर्ण.
2) चालु वर्षी जिल्हातील औषधांचा साठा ठेवण्यासाठी स्टोअर रुम बांधणे प्रस्तावीत.
3) हायवे मध्ये अपघाताने जखमी होणार्‍या जनावरांसाठी खास कक्ष.
4) राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत दवाखान्यासाठी फनीचर सेट व इनट्रुमेंट ट्रालीचा पुरवठा.

माथेरान येथील बांधकाम

1) मॉनिटरींग कमीटी कडुन नाहरकत दाखला घेवुन दवाखान्याचे नुतनिकरण पुर्ण
2) प्रथमच घोडे तपासणीसाठी पॅडॉक
3) प्रयोग शाळेची उभारणी तसेच निवासस्थान व स्वच्छता गृहाची व्यवस्था, कंपाउंड वॉल मुळे मौल्यवान जागेचे रक्षण

या वर्षीचे नियोजन

1) जिल्हा नियोजन समितीकडून नविन बांधकामास २० वीस लाख तरतुदीच्या नियोजनातुन जिल्हातील भाडयाचे दवाखाने स्वतःच्या इमारती मध्ये रुपांतरित करणे
2) चिकन - मटण दुकाने व तबेल्यांच्या नोंदणीकरणास गती देणे
3) पशुधन विकास अधिकारी यांचे दरमहा कामाचे मुल्यमापन
4) तांत्रिक MPR Online जोडणे
5) सर्व दवाखाने अत्याधुनिक उपकरणे व फणीचरने सुसज्य करणे.
6) पशुधन विकास अधिकारी (वि) यांचे दालनामध्ये सुविधा प्रदान करणे

पशुसंवर्धन विभाग : विविध योजनां अंतर्गत केलेली विकासकामे

जिल्हा स्तरीय पशु-पक्षी प्रदर्शन संकरीत वासरांचा मेळावा, नागोठणे

भव्य सोहळा
मा. अति. मु. का. अ. सो. कार्यक्रमाचे उद्दीष्ट विषद करताना
     
प्रदर्शनात सहभागी पशुंची पहाणी करताना
मान्यवरांकडून प्रदर्शनाचे कौतुक

आधिनमन शिवरायांना
उत्कृष्ट पशुपालनविषयी चर्चा
     
संयोजकामार्फत कौतुक व आभार


जिल्हा परिषद, रायगड मार्फत विविध योजनां अंतर्गत केलेली विकासकामे


कुक्कुट प्रकल्प पेण
कुक्कुट प्रकल्प पेण
     
कुत्र्याचे निर्बिजीकरण
 
मोठया शस्त्रक्रीया
 
बेवारशांचे संगोपन
 
वन्यजीव संवर्धन
 
पशु वैद्याकिय दवाखाने : बांधकामासाठी जागेचे निपटारे
 
योजनांची खरेदी व पडताळणी
 
प्रशिक्षण : प्रत्येक स्तरावरील ग्रामिण व उच्च तांत्रिक

 

 

मुख्य पान