मुख्य पान
निविदा
जाहिराती
बातम्या
बदली / भरती प्रक्रिया
  रायगड जिल्हा परिषद
  जि. प. अधिनियम
  रचना व प्रशासन
  मान्यवर
  सदस्य व पदाधिकारी
  सूची
  विभाग व योजना
  माहितीचा अधिकार
  ई-गव्हर्नंस
  अंदाज पत्रक
  नाविन्यपूर्ण उपक्रम

 

 

ई-गव्हर्नंस
  
  • जिल्‍हा परिषदेच्‍या तळ मजल्‍यापासून ते चौथ्‍या मजल्‍यापर्यंत वॉयफाय तंत्रज्ञान वापरून जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व विभागांचे संगणकीकरण करण्‍यांत आलेले आहे.
  • भविष्‍य निर्वाह निधीचे लेखे जिल्‍हा परिषदेच्‍या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्‍ध असून www.zpraigadgov.in या संकेतस्‍थळावर कर्मचारी / प्राथमिक शिक्षक यांची हिशेब चिठ्ठी आपले स्‍वतःचे नंबर टाकून प्रत्‍यक्ष प्रिंन्‍ट काढू शकतो व हिशोब वेळेवर उपलब्‍ध होऊ शकतो.
  • सर्वसाधारण भविष्‍य निर्वाह निधी लेखे सॉफ्टवेअरमध्‍ये नोंदी करणे. - जिल्‍हा परिषद कर्मचारी / प्राथमिक शिक्षक यांचे भविष्‍य निर्वाह निधी लेखे सॉफ्टवेअरमध्‍ये नोंदी घेणे, नामनिर्देशनानुसार नोंदी करणे.
  • वित्‍तप्रेषण संगणक सॉफ्टवेअर – जिल्‍हा परिषदेकडून वित्‍तप्रेषण गटांना वर्ग करणेकरिता पी.डी.एफ फाईल तयार करुन ई-मेल / ऑनलाईन द्वारे सर्व गटांना वितरीत करण्‍यांत येतो.
  • तेरावा वित्‍त आयोग – 13वा वित्‍त आयोगाचा हप्‍ता शासनाच्‍या निकषानुसार पंचायत समित्‍यांना वाटप करणेसाठी संगणक आज्ञावली तयार असून निधी वाटपाबाबत त्‍वरीत कार्यवाही करता येते.
  • लेखा विषयक आज्ञावली – जिल्‍हा परिषदेकडील लेख्‍यांबाबत संगणक आज्ञवली तयार करण्‍यांत आलेली असून ईमेल द्वारे अहवाल वेळीच प्राप्‍त करता येतो. तसेच तालुका निहाय जमा व खर्चाबाबत नोंदी त्‍या-त्‍या गटाकडून घेतल्‍या जातात.
  • पेंन्‍शनबाबत आज्ञावली तयार करण्‍यांत आलेली असून सहाव्‍या वेतन आयोगानुसार सुधारित निवृत्‍तीवेतनही संबंधितांना देणेंत येते व यापध्‍दतीने पेंन्‍शन केस जलद गतीने अंतिम सरासरी काढून संबंधित पेंन्‍शनधारकांना पेंन्‍शन मंजूरीचे आदेश देण्‍यांत येतात.
  • पगारदेयक आज्ञावली तयार करण्‍यांत आलेली असून जिल्‍हयात संपूर्ण कार्यालयात या आज्ञावलींद्वारे पगाराचे देयके तयार केली जातात.
  • पत्रव्‍यवहार ई-मेल द्वारे करण्‍यांत येत आहेत.

जिल्हा परिषद, रायगड या कार्यालयाकडील सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामे संगणकावर करणेसाठी खालील प्रमाणे स्वॉप्टवेअर व ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करण्यात येत आहे.

युनिक्स सिस्टीम

युनिक्स सिस्टीमवर जिल्हा परिषदेकडील वेतन देयके तयार केली जातात. त्याचप्रमाणे आवर्त ठेव चे गोषवारे, न वटलेल्या चेकची यादी इत्यादी कामे युनिक्स सिस्टीमवर केली जातात.

लिनक्स सिस्टीम

लिनक्स सिस्टीम व्दारे जिल्हा परिषदे कडील कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक तक्ते तयार केले जातात.

विंडोस एक्स.पी. व विस्टा

विडोसं एक्स.पी. व विस्टा ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरुन जिल्हा परिषदेकडील दररोजचे कार्यालयीन कामे संगणकावर केली जातात. या मध्ये साधारणत: जिल्हा परिषदेकडील रोजचा पत्रव्यवहार तसेच अस्थापना विषयक बाबी, प्रशासन विषयक बाबी, लेखा विषयक बाबी, बांधकाम विषयक बाबी, माहिती कक्ष विषयक बाबी, अभिलेख कक्ष बाबी, शासनास वेळोवळी पाठविले जाणारे अहवाल इत्यादींची कामे या ऑपरेटींग सिस्टी व्दारे केली जातात. 

लॅन

जिल्हा परिषद, रायगड कडील सर्व विभाग लॅन ने जोडणेत आलेले आहेत.

इंटरनेट

रायगड जिल्हा परिषदेमध्ये साधारणत: सर्व विभागामध्ये इंटरनेट सुविधा सुरु करणेत आलेली आहे. तसेच मा. अध्यक्ष, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, वित्त विभाग, संगणक कक्ष यांचे दालनामध्ये इंटरनेट सुविधा सुरु आहे. जिल्हा परिषद, रायगड मध्ये सध्या बी.एस.एन.एल. ब्रॉडबॅड इंटरनेट सुविधा सुरु आहे.

तसेच महाराष्ट शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागा कडुन महानेटची सोय सर्व जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय कार्यालयांना उपलब्ध करुन दिलेली आहे.

 

मुख्य पान